"अखंड सेवा, सक्षम नागरिक"

आमची यशोगाथा

ग्रामपंचायत पिंप्री सैय्यद ता.जि. नाशिक ठिकाणापासून १६ की.मी. अंतरावर असून सदर गावाची लोकसंख्या १०३५३ असून गावाचे हद्दीत २२९८ कुटुंब आहेत. पिंप्री सैय्यद गावाला सामाजिक, आध्यात्मिक, राजकीय,शैक्षणिक व क्रांतीकारी गांव म्हणून उभ्या महाराष्ट्रात ओळखल जाते. प्रगतीच्या अनेक पाऊल खूणा सोडत गगनाला गवसणी घालणारी प्रगती ह्या गावाने केली आहे. ऐतिहासिक वारसा ह्या गावाने जपला आहे. पिंप्री सैय्य्द गावात प्रवेश करण्यापूर्वीच गोदावरी डावा तट कालवा स्वागत करतो की ह्याच कालव्यामुळे गावचा शेती शिवार सुजलाम सुफलाम झाला आहे. गावातील मुख्य व्यवसाय द्राक्षशेती, भाजीपाला, दुग्ध व्यवसाय, रोपवाटिका असून त्यामधून गावाचे अर्थकरण भक्कम आहे.

ग्रामपंचायत कार्यालय

ग्रामपंचायत पिंप्री सैय्यद सर्व सुविधांनी परिपूर्ण असे अद्यावत ग्रामपंचायत कार्यालय कार्यान्वित असून संपूर्ण कामकाज संगणकीय पद्धतीचे असून कार्यालयातच पोस्ट ऑफिस व तलाठी कार्यालय आहे. पूर्वीच्या लहान कार्यालयाचा बदल होऊन सर्व सूविंधायुक्त परिपूर्ण इमारत असून शौचालय, सोलार लाइट, बैठक व्यवस्था, रेकार्ड रूम इ. आवश्यक सुविधा आहेत.

चित्रफीत

ग्रामपंचायत पुरस्कार : ग्रामपंचायतीला शासकीय स्पर्धा स्तरावर निर्मल ग्राम पुरस्कार, स्मार्ट व्हिलेज पुरस्कार संत गाडगेबाबा ग्राम स्वच्छता पुरस्कार, सामाजिक सलोखा पुरस्कार, वनश्री पुरस्कार, कृषीथॉन आदर्श ग्रामपंचायत पुरस्कार, अ‍ॅग्रोवर्ल्ड, माझी वसुंधरा अभियान, उत्कृष्ट ग्रामपंचायत पुरस्कार मिळाले आहेत.

प्राथमिक विद्या मंदिर: इंग्रजकालीन प्राथमिक शाळा असलेल्या शाळेत अनेक विद्यार्थी यांनी शिक्षण घेऊन आज ते उच्च पदस्थ अधिकारी आहेत. आज शाळेत सेमी इंग्रजी वर्ग सुरू असून सोलर, शौचालय पिण्याचा पाण्याची ,कंपोष्ट इ. आवश्यक सुविधा आहेत.

तालुका क्रिडा संकुल : राज्य शासनाच्या संकल्पनेतून तयार झालेले तालुका क्रिडा संकुल उभारण्यात आले असून ह्याच मैदानातून सलिल अंकोला सारखे खेळाडू तयार होऊन राष्ट्रीय पातळीवर खेळले आहेत. सदर क्रीडा संकुलात कबड्डी , क्रिकेट, स्पर्धा होत असून गावातील खेळाडू तयार होत आहेत.

प्राथमिक आरोग्य केंद्र : प्राथमिक आरोग्य केंद्र पर्यावरणीय दृष्ट्या बांधकाम केले आहेत. सदर इमारतीवर सोलर लाइट , सोलर वाटर हिटर , वनऔषधी झाडे लावण्यात आलली असून डिजिटल पद्धतीने OPD चे कामकाज चालते. कोरोना काळात रुग्णांना सेवा देण्यात हे प्रा.आ.केंद्र आघाडी वर होते तसेच प्रा.आ.केंद्रात ऑक्सीजन प्लांटची देखील सोय उपलब्ध करण्यात आलेली आहे. पंचक्रोशीतील रुग्ण /ग्रामस्थानसाठी २४ तास सेवा प्राथमिक आरोग्य केंद्रामार्फत देण्यात येते. तसेच प्राथमिक आरोग्य केंद्रास शासनाचे कायाकल्प पुरस्कार मिळालेले आहेत गावात सुसज्ज अभ्यासिका, मारुती मंदिर सभामंडप व रस्ते सिमेंट कॉँक्रिटकरण, भूमिगत विद्युतीकरण झाल्याने गावच्या वैभवात भर पडली आहे.

शॉपिंग सेंटर: गावात १२१ व्यापारी गाळे असून सदर गाळे लोकसहभागातून लिलाव पद्धतीने बांधकाम करून व्यवसायिकांना उपलब्ध करून दिले आहेत. सदर व्यापारी गाळ्यांचा वार्षिक भाड्यातून नियमित उत्पन्न मिळत आहेत.तसेच गावातीलच ग्रामस्थ तरुण वर्गास सदर गाळयांमध्ये व्यवसाय करत असल्याने रोजगार उपलब्ध होण्यास मदत झालेली आहे.

पाणीपुरवठा: जल मिशन योजने अंतर्गत गावात शुध्द पाणी पुरवठा व्हावा म्हणून २ पाण्याच्या टाक्या असून सकाळ-संध्याकाळ मुबलक पाणी पुरवठा केला जातो. गावात जलजीवन मिशन अंतर्गत नवीन पाणीपुरवठा योजना देखील मंजूर होऊन त्यांचे काम पूर्ण नवीन टाकीचे विहीरीचे काम पूर्ण झाल्याने मुबलक पाणीपुरवठा केला जात आहे. आजपर्यंत गेल्या ५ (पाच) वर्षात एकही साथरोग नाही.

प्लॅस्टिक कचरा व्यवस्थापन:निरुपयोगी प्रदूषण करणारे प्लॅस्टिक ग्रा.प.मार्फत खरेदी करून त्याचे रीसायकलिंग केल जाते.

वैकुंठरथ: सदर रथ ग्रामस्थांना अंत्यविधी साठी ग्रा.प.कडून मोफत दिला जातो.

हगणदारी मुक्त गाव:घर तिथे शौचालय संकल्पनेतून प्रत्येक घरकुलाला शौचालय निर्मिती करून उघड्यावर शौच करणाऱ्या ग्रामस्थांना प्रसंगी कारवाई व प्रबोधन करून गांव हगणदारी मुक्त करण्यात आले आहे.

भूमिगत गटार: शासनाच्या भूमिगत गटार योजनेचा वापर करून गावातील सांडपाणी भूमिगत गटारी मार्फत विल्हेवाट लावली जाते.

भूमिगत विद्युत वाहिनी: गावातील पूर्ण विद्युत वाहिनी ह्या भूमिगत केलेल्या आहेत.

वॉटर ए.टी.एम: वॉटर एटीम द्वारे आर.ओ पाणी अल्प दरात ग्रामस्थांना उपलब्ध करून देण्यात आले आहे.

मलनिस्सारण वाहिका : गावातील व शिवारातील शौचालयासाठी मलनिस्सारण वाहीका उपलब्ध केलेली आहे.

जल पुर्नभरण:जल पुर्नभरण(रेन वॉटर हार्वेस्टिंग)योजने अंतर्गत ग्रामस्थांना प्रबोधन केल्याने अनेक ग्रामस्थांनी आपल्या घरावर रेन हार्वेस्टिंग प्रणाली उभारली आहे.

गावतळे: गावच्या पाणी पुरवठ्यासाठी दोन गावतळे असून त्यात मत्सल्यपालन व्यवसाय केला जातो त्यामधून ग्रामपंचायतीत निश्चित उत्पन्न मिळते.

अंगणवाडी : गावात 12 अंगणवाडी कार्यरत असून अंगणवाडीत आर.ओ पाणी, डिजिटल शिक्षण व संगणकाचे प्राथमिक धडे दिले जातात..

पशू वैद्यकीय दवाखाना : गावात पशू वैद्यकीय दवाखाना कार्यरत असून परिसरातील पशू चिकीत्सा व पशूपालन संदर्भात पशुपालकांना अवगत केले जाते. सदर सोलरद्वारे विद्युतपुरवठा होतो.

दूध संस्था: सिद्धेश्वर दूध उत्पादन संस्था कार्यरत असून दूध उत्पादक शेतकऱ्यांना दूध उत्पादनातून नियमित आर्थिक उत्पन्न मिळते.

पतसंस्था: गावाचे भूमिपुत्र कै.उत्तमराव ढिकले ह्यांच्या प्रेरणेने सुरू असलेली उत्तमराव ढिकले पतसंस्था कार्यरत असून सभासदांना नियमित कर्जपुरवठा केला जातो.

माध्यमिक शाळा: साने गुरुजी विद्याप्रसारक संस्थेचे नूतन मध्यमिक विद्यालय कार्यरत असून हायस्कूल अंतर्गत "व्हाईट रोज" इंग्लिश मिडियम स्कूल आहे.

सामाजिक वनीकरण: ग्रामपंचायत मार्फत सामाजिक वनीकरण 45 हेक्टर वर करण्यात येऊन वनीकरणात जंगली वनस्पती बरोबर वन औषधी ची लागवड केलेली आहे. वणीकरणाचे सुसूत्र संगोपन केल्याने शासनाचा वनश्री पुरस्कार मिळाला आहे.

सभागृह : ग्रामपंचायत मार्फत गावकऱ्यांना कार्यक्रमासाठी मंगल कार्यालय निर्मिती केली असून ग्रामस्थांना माफक दरात सेवा व सुविधा दिल्या जातात. ग्रामपंचायतीस निश्चित उत्पन्न दिले.

अभ्यासिका: गावात सुसज्ज अभ्यासिकेचे बांधकाम केले असून सदर अभ्यासिका उपयोग गावातील तरुण मुलांना स्पर्धा परीक्षेचा तयारीसाठी होत आहेत. सदर बाब गावासाठी भूषणावाह आहेत.

यात्रा महोत्सव: दरवर्षी गुढीपाडव्याला ग्रामदैवत श्री सप्तसिद्ध महाराज देवस्थानाची यात्रा भरते. यात्रेत लाखो भाविक येतात. तसेच सदर ग्रामदैवत सर्व व्यवस्थापन ग्रामपंचायतीच्या ताब्यात असून भाविकांकडून जमा होणारी देणगी ग्रामपंचायत स्वनिधीत जमा होते.

जल संधारण: गाव शिवारात नाले, ओहोळावर के.टी वेअर वनराई बंधारे बांधून पाणी आडवा,पाणी जिरवा संकल्पनेतून बंधारे निर्मिती केली असून वाहून जाणारे पाणी अडवून जलस्तर वाढवण्यास मदत झालेली आहे.

अनुसूचीत जाती व नवबौद्ध घटक योजना: अनुसूचीत जाती व नवबौद्ध घटक योजनाचा माध्यमातून हाय मास्ट लाईट, कॉँक्रीट रस्ते, भूमिगत विद्युतकरण आदी सर्व सुविधा उपलब्ध करण्यात आल्या आहेत.

बौद्ध स्तूप: गावातील राजवाड्यात बौद्ध स्तूप असून त्यामध्ये घटनेचे शिल्पकार डॉ.बाबासाहेब आंबेडकर ह्यांच्या अस्थी आहे.

पारंपारीक रूढी बद्दल: नवरदेव मिरवणूक न काढणे, वरातीची प्रथा बंद, थोर पुरुषांच्या मिरवणूक बंद करून प्रबोधनात्मक कार्यक्रमांचे आयोजन केले जाते

डिजिटल पर्जन्यमापक: ग्रामपंचायतने अद्यावत डिजिटल पर्जन्यमापक बसवले असून त्यामुळे पडलेल्या पावसाची माहिती ग्रामस्थांना उपलब्ध होते.

ठळक वैशिष्ट्ये
१) व्हक्युम मशीनचे वार्षिक निश्चित उत्पन्न
२) ग्रामपंचायतकडे स्वत:च्या मालकीचे दोन टँकर आहेत. टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जातो. तसेच वृक्षारोपण आणि इतर सार्वजनिक कार्यक्रमास माफक दरात पुरवठा केला जातो.
३) स्वच्छ पाणी पुरवठयासाठी वॉटर एटीएम असून थंडगार व नॉर्मल प्रती २० ली. पाणी ५ रु व १० रु. मध्ये पुरवठा केला जातो.
४) गावात आठवडा बाजारपेठ आहेत
५) देवस्थान ग्रामपंचायतीच्या ताब्यात आहेत. भाविकांचा भक्त तेथे असलेल्या दानपेटी मध्ये दान करतात त्यामधून ग्रामपंचायतीस देणगी स्वरुपात उत्पन्न मिळते.
६) गावातील तरुण तसेच दिव्यांग विधवा महिला तसेच इतर गरजू महिला व ग्रामस्थ यांना जागा भाड्याने दिले आहेत. त्यातून ग्रामपंचायतीस रोजगार उपलब्ध होऊन ग्रामपंचायतीस जागाभाडे रूपाने उत्पन्न मिळते.
७) गावातील गावततले , पाझरतलाव यामध्ये मत्स्यपालन व्यवसाय केला जात असल्याने त्यामधून ग्रामपंचायतीस उत्पन्न मिळते. व रोजगार देखील उपलब्ध केला आहे.
८) दगड विक्री, फेरफार नोंदी, प्रमाणपत्र शुल्क द्वारे निश्चित उत्पन्न मिळते.
सर्व शाळा, अंगणवाडी प्राथमिक आरोग्य केंद्र, ग्रामपंचायत सौरऊर्जा, पाणीपुरवठा योजना सौर उर्जेवर आहेत. आज अखेर विजबिल, कर्मचारी पगार देणे बाकी नाही. ग्रामपंचायत स्वयंपूर्ण आहेत.

प्रशासकीय संरचना


"       ि    ि ि ि"

- जलयुक्त शिवार अभियान

पदाधिकारी


भारतातील पंचायती राज हे ग्रामीण स्थानिक स्वराज्य प्रणालीचे प्रतीक आहे.

जन्म, मृत्यू व विवाह यांची नोंदणी अवश्य करा

लोकसंख्या आकडेवारी


2298
10353
5840
4513

Logo
Logo
Logo
Logo
Logo
Logo
Logo
Logo
Logo
Logo
Logo
Logo